शनिवार, 14 Nov 2026 ✉️ info@yourdomain.com
राजकारण

पाणीप्रश्नावर राजकारण न करता सहकार्य करा-नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी

पाणीप्रश्नावर राजकारण न करता सहकार्य करा-नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी

जामखेड :

पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, नागरिक, प्रशासन आणि पत्रकार यांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी केले.

जाहिरात / Advertisementसमर्थ ent

या वेळी या वेळी नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, मनोज कुलकर्णी, श्रीराम डोके, प्रवीण चोरडिया, विकी गायकवाड, प्रशांत होळकर, मोहन पवार आणि अमित चिंतामणी आदी उपस्थित होते.

जाहिरात / AdvertisementB1

शहरासह उपनगरातील विविध वाड्या-वस्त्यांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सरसावले आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे मागणी करण्याबाबत बुधवार (दि. २८) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्यात येणार आहे. दुसरीकडे, भुतवडा तलावातून पाणीउपसा सुरू करण्यात आला असून, देहिगाव (उजनी) ते जामखेड पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लावण्यासाठीही प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

शहरातील काही भागांत, तसेच जांबवाडी, भुतवडा, लहानेवाडी, धोत्री, बेटवाडी, नानजवाडी आणि चोंडी या गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरपरिषदेकडून तातडीच्या उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत.

भुतवडा तलावातून पाणी उपसा सुरू

पाणीटंचाई कमी करण्यासाठी भुतवडा तलावातून पाणीउपसा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून पाच पाणबुडी मोटारींच्या सहाय्याने पाणी उपसले जात असून, उपलब्ध जलसाठ्याचा उपयोग पाणीपुरवठ्यासाठी केला जात आहे. याशिवाय, पाणीटंचाईग्रस्त भागांतील विहिरींचे खोलीकरण करणे, त्यातील गाळ काढणे आणि आवश्यकतेनुसार आडवे बोअर घेणे, अशा उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. शहर व उपनगरांतील ज्या विहिरी आणि बोअरवेलमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, त्यांचे अधिग्रहण करून त्या स्रोतांचा पाणीपुरवठ्यासाठी वापर करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.

देहिगाव-उजनी योजनेसाठी पाठपुरावा

जामखेड शहर आणि उपनगरांतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देहिगाव (उजनी) ते जामखेड पाणीपुरवठा योजना महत्त्वाची ठरणार आहे. ही योजना पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, मनोज कुलकर्णी यांनी ही जागा नगरपरिषदेला विनामोबदला बक्षीसपत्राद्वारे दिली आहे. योजनेसाठी आवश्यक परवानग्या लवकर मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. तसेच पाणीपुरवठा वाहिनी काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून जाणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांशी समन्वय साधून अडचणी सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.