
जामखेड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय छात्र सेना (आर्मी), १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अहिल्यानगर व सर्व प्रशासकीय विभागाच्या वतीने कर्नल निकेत नेगी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य ७५ मीटर तिरंगा रॅलीचे आयोजन गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.

या देशभक्तीपर रॅलीचा प्रारंभ तहसील कार्यालयाच्या पटांगणातून झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे,पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, हरिभाऊ बेलेकर, मंडळ अधिकारी आय एन काळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्राचार्य बाळासाहेब पारखे,प्राचार्य बी के मडके,प्राचार्य डॉ कॅप्टन गौतम केळकर,उपमुख्याधपक सेकंड ऑफिसर अनिल देडे, उपप्राचार्य युवराज भोसले पर्यवेक्षक सुदाम वराट, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, मोहन यादव, सुग्रीव ठाकरे माजी सैनिक संघटना अध्यक्ष बजरंग डोके, शिवनेरी अकॅडमी संचालक नि कॅप्टन लक्ष्मण भोरे,प्रा आण्णा मोहिते,नानासाहेब बाबर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय विभागातील अधिकारी, जामखेड महाविद्याल, ल ना होशिंग विद्यालय व रयतचे श्री नागेश विद्यालय जामखेडचे एनसीसी कॅडेट, कन्या विद्यालय शिक्षक, महिला,शहरातील ग्रामस्थ आजी माजी सैनिक, उपस्थित होते.
यावेळी नायब तहसीलदार पांडुळे व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी हर घर तिरंगा रॅली ला शुभेच्छा देऊन या उपक्रम चे अभिनंदन केले.
रॅलीमध्ये ७५ मीटर लांबीचा तिरंगा घेऊन विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी विविध ठिकाणी पुष्प टाकून तिरंगा रॅलीचे ग्रामस्थांनी विशेष स्वागत केले.
यावेळी हर घर तिरंगा,भारत माता की जय, हमारी जान तिरंगा, वंदे मातरम, अशा घोषनेने संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला.
रॅलीचा मार्ग तहसील कार्यालय पटांगण – बीड रोड – जय हिंद चौक – छत्रपती शिवाजी महाराज पेठ – संविधान स्तंभ – खर्डा चौक – तपनेश्वर रोड – बीड रोड – तहसील कार्यालय – जामखेड महाविद्यालय, जामखेड असा होता.
शहीद जवान गणेश भोसले प्रतिष्ठानच्या वतीने तिरंगा ध्व्ज उपलब्ध करून देण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रध्वजाविषयी आदर आणि देशभक्तीची भावना जनमानसात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रास्ताविक कॅप्टन गौतम केळकर, सूत्रसंचलन सेकंड ऑफिसर अनिल देडे तर आभार प्रदर्शन सेकंड ऑफिसर मयूर भोसले यांनी केले.